You are currently viewing महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर व संभाजीनगरच्या वतीने  वृक्षारोपण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर व संभाजीनगरच्या वतीने  वृक्षारोपण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर व संभाजीनगरच्या वतीने  वृक्षारोपण

पुणे

5 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम उद्योग नगर केंद्राच्या मैदानात घेण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे मा. गीताताई भांदुर्गे अप्पर  सचिव पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई, सिकंदर घोडके टीम लीडर इ सी ए, शारदाताई मुंडे समाजप्रबोधनकार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुण पवार वृक्ष मित्र पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली जांभूळ, चिंच,साग,आंबा,कडूनिंब अशा विविध 50 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे सर्वांनी सामूहिकपणे पर्यावरणाचे जतन करण्याचे प्रतिज्ञा घेण्यात आली,सदर कार्यक्रमाकरिता कामगार भूषण मोहन गायकवाड,, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, वसंत,भांदुर्गे, मोहम्मद शरीफ मुलानी,स्वानंद राजपाठक, राजेश हजारे,शिवराज शिंदे,सूर्यकांत बरसावडे,तानाजी एकोंडे,बाळासाहेब साळुंखे,सुभाष चव्हाण,भरत शिंदे,अण्णा गुरव, संदीप रांगोळे,सुधाकर खुडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुलांनी,अजित असबे,चंद्रकांत बरसावळे, पांडुरंग सुतार,राहुल पाटील, राजेश गाढवे,अरुण कळंबे, शंकर देशमुख, सुनील भट, विलास सैद,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचे वृक्ष मित्र अरुण पवार यांनी वृक्ष रोपनासाठी झाडे दिली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक प्रदीप  बोरसे यांनी केले तर आभार संदीप गावडे यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन अश्विनीताई दहितूले,रूपाली मुळीक,माया कदम सतीश चव्हाण, भास्कर मुंडे,शंकर शेलार,यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा