वर्ल्ड बायसिकल डे २०२६ निमित्त ‘संडे ऑन सायकल’ रॅलीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत फिट इंडिया मोहिमेद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वर्ल्ड बायसिकल डे २०२६ निमित्त रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन, कुडाळ येथे जिल्हास्तरीय ‘संडे ऑन सायकल’या विशेष सायकल रॅली व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित करणे, पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर आयोजित करण्यात अलेल्या –संडे ऑन सायकल उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू, क्रीडाप्रेमी, युवक-युवती, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे,
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नियोजित वेळ व स्थळी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. वर्ल्ड बायसिकल डेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. सदरच्या रॅलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, युवक, युवती खेळाडू, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
रॅलीचा मार्ग :- कुडाळ पोलीस स्टेशन ते अंडरपास शिवाजी इंग्लीश स्कूल पणदूर तिठा- कुडाळ पोलीस स्टेशन असा आहे.
