You are currently viewing खवल्या मांजर व सांबर शिंग तस्करी प्रकरण: संशयितांना 50 हजारांचा जामीन

खवल्या मांजर व सांबर शिंग तस्करी प्रकरण: संशयितांना 50 हजारांचा जामीन

खवल्या मांजर व सांबर शिंग तस्करी प्रकरण: संशयितांना 50 हजारांचा जामीन

अॅड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस:

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्मिळ खवल्या मांजराचे खवले आणि सांबराच्या शिंगांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ओरोस येथील मा. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके यांनी 3 जून 2026 रोजी हा निर्णय दिला.
29 मे 2026 रोजी पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने छापा टाकून संशयितांना अटक केली होती. संशयितांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील अॅड. अशपाक शेख यांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितांची 50,000/- रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात संशयितांच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले, तर अॅड. पंकज खरवडे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा