You are currently viewing अंतरंगी

अंतरंगी

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ गझलकारा डॉ. शरयू शहा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

आनंदकंद

 

🌷*अंतरंगी*🌷

 

अपरिग्रहात आस्था, अध्यात्म आकळावे

आभूषणात असल्या, अंतर्हृदय असावे

 

अत्यंत आत्मप्रौढी, अंगात एकवटुनी

अपुल्यातल्या अहंला, आत्ताच उचकटावे

 

आकांत अनुभवांनी, आयुष्य उसवलेले

अव्हेरुनीच आता, आशेस उंचवावे

 

अवघ्या उचापतींची, उंचावण्या इयत्ता

अपुल्याच आजवरच्या उर्जेस आठवावे

 

अक्षर उपासनेच्या, उतरून अंतरंगी

अलवार अनुनयाने, आतून आळवावे

 

ईर्ष्या अशी असूया, ओझे इथे उरावर

ईश्वर उपासनेने, अल्लाद उतरवावे

 

इच्छेनुसार अपुले, आयुष्य आखण्याने

आव्हान उचलण्याचे, आश्च़र्य अनुभवावे

 

डॉ.शरयू शहा,मुंबई.

9619023330

 

प्रत्येक शब्द सुरुवात *अ* बाराखडीने

प्रतिक्रिया व्यक्त करा