*दिव्यांग बांधवांचा कणकवली बौद्ध विहार येथे भव्य दिव्य मेळावा उत्साहात संपन्न*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, उद्योजक दीपक बेलवलकर साहेब, तसेच हेल्पर ऑफ दि हॅंडीकॅप कोल्हापूर, व्यापारी संघटना अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१ जून हेलन कीलर दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा सोमवारी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये सिंधुदुर्ग साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल अध्यक्ष अनिल शिंगाडे सर
उपाध्यक्ष शामसुंदर लोट सर
सहसचिव सुनील तांबे सर
कणकवली नगराध्यक्ष संदेशजी पारकर साहेब, कणकवली नगरसेवक कांबळे साहेब
हेल्पर ऑफ दि हॅण्डिकप कोल्हापूर संस्था प्रतिनिधी,
सौ.रोशनी अमोल देशमुख
सौ.नीता मनोहर देशभ्रतार
सौ. उज्वला सुतार
कु.प्रियंका शिंदे
जॉन ठोंबरे
नॅप संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष अनंत उसगावकर सर
नॅप संस्था सिंधुदुर्ग सचिव सोमनाथ सर
व्यापारी संघटना अध्यक्ष व पदाधिकारी
उद्योजक अध्यक्ष दीपक बेलवलकर साहेब
उपाध्यक्ष राजन पारकर सर राजाराजाध्यक्ष सर सचिव निवृत्ती धडाम सदस्य, बंडू खोत सर माजी अध्यक्ष, उबाळे सर, सदस्य काका करंबळेकर सर सल्लागार, गोलंदाज सर रत्नागिरी,
राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ विभागीय शाखा कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे
साईकृपा संस्था कर्मचारी
विशाखा गौतम कासले प्रसन्ना शिर्के
ललित गावडे अभय शिंगाडे प्रकाश वाघ
सविता गावडे प्रशांत कदम, प्रणाली कदम, अश्विनी पालव सत्यवान पावले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर, अहिल्याबाई होळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्था कर्मचारी विशाखा कासले मॅडम यांनी संस्थेचे थोडक्यात अहवाल वाचन केले.दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच कणकवली नगराध्यक्ष संदेशजी पारकर सर यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. ते असे म्हणाले अनिल शिंगाडे यांचं जे चांगले कार्य आहे त्या सगळ्या चांगल्या कार्यांचा मी साक्षीदार आहे असे ते बोलताना म्हणाले.तुम्ही नेहमी एकत्र रहा संघटित व्हा. आणि या कणकवली तालुक्याचा नगराध्यक्ष म्हणून मला जे काही करता येईल ते सर्व मी तुमच्यासाठी करेन आणि नेहमी तुमच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही दिली.
त्यानंतर नॅप संस्था अध्यक्ष उसगावकर सर यांनीही दिव्यांग बांधवांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मॅप संस्थेबद्दल माहिती सांगितली व मोफत डोळे तपासणी करतो असे सांगितले. त्यांनी सांगितले अनिल शिंगाडे यांचे काम खूप कौतुकास्पद आहे मी त्यांचे खूप कौतुक करतो आणि दिव्यांग बांधवांचे पाठबळ आहे आणि त्या पाठबळावर ते साईकृपा संस्था चालवतात असे ते म्हणाले. माननीय गोलंदाज सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. हेल्पर ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूर,संस्थेच्या प्रतिनिधी सौ रोशनी देशमुख मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना बहुमुलाचे असे मार्गदर्शन केले व दिव्यांग बांधवांना उभारी दिली. तसेच सौ रोशनी देशमुख मॅडम यांनी हेल्पर ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूर या संस्थेबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले व त्या संस्थेमध्ये हॉस्टेल व्यवस्था, वेगवेगळे प्रशिक्षण घेतले जाते, तसेच शिष्यवृत्ती दिली जाते या आदी विषयांचे मार्गदर्शन केले व माहिती दिली.अनिल शिंगाडे सर हे सतत दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा देत असतात ते लढा देत असताना तुम्हीही त्यांना साथ द्या असे आवाहन केले. सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने संतोष केगडे यांना हँड सायकल देण्यात आली.
या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली या मेळाव्यामध्ये 100 हून जास्त दिव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांची भोजनाची व्यवस्था हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूर व साईकृपा संस्थेच्या वतीने करण्यात आले.उपस्थित दिव्यांग बांधवांना व्यापारी संघटना व उद्योजक अध्यक्ष दीपक बेलवलकर साहेब यांच्या वतीने भेट वस्तूंच्या स्वरूपात छत्री वाटप करण्यात आले. तसेच संदेशजी पारकर साहेब यांनी या कार्यक्रमासाठी योगदान देऊन कार्यक्रमाला हातभार लावला. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांना भोजन करून देणाऱ्या अलका भोई यांचेही बहुमोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. हा मेळावा अतिशय खेळीमेळीने व आनंदमयी वातावरणात पार पडला.संस्था कर्मचारी शिर्के मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
