मातोश्री शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते औक्षण; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सावंतवाडी :
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मातोश्री शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते त्यांचे औक्षण करण्यात आले. लखमराजे भोसले यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छा उपस्थितांकडून देण्यात आल्या.
यावेळी राजे खेम सावंत-भोसले युवराज्ञी तसेच नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले, अजय दोडिया, जयश्री दोडिया, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. दिलीप भारमल, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
युवराज लखमराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
