You are currently viewing विक्रांत सावंत यांचे जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून अभिष्टचिंतन
Oplus_16908288

विक्रांत सावंत यांचे जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून अभिष्टचिंतन

वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट; जिल्हा परिषदेच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा

सावंतवाडी :

मालगाव जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते विक्रांत विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत अभिष्टचिंतन केले. यावेळी वाफोलीचे उपसरपंच विनेश गवस उपस्थित होते.

या भेटीदरम्यान प्रमोद कामत आणि विक्रांत सावंत यांच्यात विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेली विकासकामे तसेच प्रस्तावित प्रकल्पांबाबत विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी प्रमोद कामत यांनी विक्रांत सावंत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, “तुमचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास मी सदैव तत्पर असेन,” अशी ग्वाही दिली.

तसेच विक्रांत सावंत यांना पुढील सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा