You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवार दिनांक 25/05/2026 रोजी आंबोली विभागातील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये आंबोली गावचे सरपंच सौ.सावित्री पालयेकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटलेकर सर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एस.जी.गोसावी सर, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे अध्यक्ष श्री.बाबुराव गावडे सर, सौ.सविता गावडे मॅडम, विनायक देसाई सर,तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले मॅडम, प्रसन्ना शिर्के मॅडम,ललित गावडे सर, पवित्रा शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने हेलन कीलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था कर्मचारी विशाखा कासले मॅडम यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. व आम्ही तुमच्या पर्यंत तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहोत त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. असे आवाहन संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांनी केले.तसेच आंबोली गावचे सौ. सावित्री पालयेकर मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.आणि ते बोलताना असे म्हणाले की तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या अनिल शिंगाडे सरांना सांगून त्या समस्यांचे निवारण करून घ्या आणि या मेळाव्याचा तुम्ही फायदा करून घ्या असे आवाहन आंबोली गावचे सरपंच सौ सावित्री पालयेकर मॅडम यांनी केले.तसेच साईकृपा संस्थेच्या वतीने नेहा पाटकारे आणि सिद्धी पडवळ यांना कानाची मशीन देण्यात आली.व बाळकृष्ण गावडे यांना वॉकिंग स्टिक देण्यात आली.या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले.संस्था कर्मचारी सौ.शिर्के मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा