You are currently viewing सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव

राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोकणवासीयांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी

सावंतवाडी

कोकण रेल्वे चे शिल्पकार ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक या स्थानकाच्या नामांतरास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोकण रेल्वेच्या उभारणीत मधु दंडवते यांचे मोठे योगदान राहिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा