You are currently viewing टाकाऊ वस्तूंमधून साकारतील कलाकृती

टाकाऊ वस्तूंमधून साकारतील कलाकृती

*टाकाऊ वस्तूंमधून साकारतील कलाकृती*

*सावंतवाडीत “बेस्ट फ्रॉम वेस्ट” स्पर्धेचे आयोजन*

*विनायक पर्यटन सहकारी संस्था व नगरपरिषद सावंतवाडीचा संयुक्त उपक्रम; आकर्षक बक्षिसांसह पर्यावरणपूरक सर्जनशीलतेला चालना*

*सावंतवाडी*

पर्यावरण संवर्धनासोबतच नागरिकांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विनायक पर्यटन सहकारी संस्था आणि नगरपरिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “बेस्ट फ्रॉम वेस्ट” या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टाकाऊ वस्तूंमधून उपयुक्त, आकर्षक व टिकाऊ वस्तू तयार करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा शनिवार, ३० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत बॅ. नाथ पै सभागृहासमोरील परिसर, नगरपरिषद सावंतवाडी येथे होणार आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शनही भरविण्यात येणार असून पर्यावरणपूरक विचारांना चालना देणारा हा अभिनव उपक्रम ठरणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १२०० रुपये व तृतीय क्रमांकासाठी १००० रुपये अशी रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

कोणत्याही प्रकारच्या टाकाऊ साहित्यापासून वस्तू तयार करण्यास मुभा देण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी तयार केलेल्या कलाकृती व नावनोंदणी दि. २९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अद्विक बिझनेस हब, पाटेश्वर कॉम्प्लेक्स, हॉटेल मँगोच्या मागे, रुची हॉटेलसमोर, बाजारपेठ सावंतवाडी येथे स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी
सौ. मेघना राऊळ – 9423219781
देव्या सुर्याजी – 8275652073
अक्षय सावंत – 7875875754
सौ. अन्नपूर्णा कोरगावकर – 9422379570
सौ. धनदा देशमुख – 9420739016

यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा