You are currently viewing झोळंबे येथे २४ मे रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन”

झोळंबे येथे २४ मे रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन”

“झोळंबे येथे २४ मे रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन”*

दोडामार्ग

श्री देवी माऊली मंदिर, झोळंबे येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, श्री स्वामी समर्थ महाराज यांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे झोळंबे गावात प्रथमच आगमन होत असून यानिमित्ताने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी १० वाजता स्वामी पादुकांची नामघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर श्री देवी माऊली मंदिर येथे अभिषेक व महाआरती कार्यक्रम होणार असून पाच दांपत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वेदमूर्ती श्री नितीन महाराज पुजारी, ब्रह्मवृंद, श्री दादा गावस तसेच गुरुमाऊली (स्वामी समर्थ मठ घावनळे ) उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ ते ४ या वेळेत दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजता स्वामी पादुकांची पालखी अक्कलकोटकडे मार्गस्थ होणार आहे.

या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त झोळंबे ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा