अमरावती( प्रति) / दि. 22/5/26 – ज्या विद्यार्थ्याला आपल्या जीवनात समाजाची सेवा करावयाची आहे. लोककल्याणकारी योजना राबवायच्या आहेत अशांनी प्रशासनिक सेवेत दाखल होऊन देशाची सेवा करावी. मिशन आय ए एस मध्ये विद्यार्थ्यांसाठी जे दरवर्षी संस्कार शिबीरे आयोजित केली जातात या शिबिराला राज्यभरातून शेकडो विद्यार्थी भाग घेतात. अशी संस्कार शिबीरे उद्याची आदर्श पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करीत आहे. यामध्ये मोलाचा वाटा मिशन आय ए एस चा आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. विकास खारगे यांनी आज मिशन आय एस च्या रजतजयंतीच्या संस्कार शिबीर समारोपिय कार्यक्रमातून केले. यावेळी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी वर्ग, पालक, शिक्षक, अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
दि. 16 मे ते 22 मे दरम्यान गेल्या सात दिवसापासून हे संस्कार शिबीर वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने संपन्न झाले. या शिबिराला सात दिवस चाललेल्या वेगवेगळ्या संस्कार उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या 25 वर्षांपासून मिशन आय ए एस चे संचालक प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे, त्यांच्या सहचारिणी विद्याताई काठोळे, मुलगी प्रा. पल्लवी येरूळकर यांनी अत्यंत निष्ठेने आणि समर्पित भावनेने हे कार्य अविरत सुरु ठेवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा. सचिव विकास खारगे यांनी त्यांचे कौतुक करून स्वतःच्या हस्ते सत्कार केला. अशा शैक्षणिक कार्यासाठी काठोळे सरांची आज खरोखर महाराष्ट्राला गरज असल्याचा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. सुरुवातीला या कार्यक्रमात सर्व अतिथी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जीवन गौरव पुरस्कार देऊन श्री विकास खारगे यांचे वडील श्री शंकरराव खारगे यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार त्यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र श्री विकास खारगे आयएएस अप्पर मुख्य सचिव यांनी स्वीकारला. तसेच मिशन आय एस च्या वतीने अवर सचिव विकास खारगे यांचा सुद्धा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी सर्वस्वी जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर, देवेंद्र खडसे प्राचार्य रामदास चौरे,श्री गिरीधर देशमुख, श्री महबूब कासार,श्री मुनिराज कुथे,श्री संजय काशिवार डॉ. गजानन उन्हाळे,शंकरराव पत्रे शांतीलाल कोठारी, नंदकिशोर खडसे यांचा संमेलनाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विचार पिठावर जिल्हाधिकारी आशिष येरेकर, शारदाताई इटणकर, मिशन चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र खडसे, उद्योजक चंद्र शेखर मुरादे, उपायुक्त मा. मेहबूब कासार, सचिन माळकर, गजानन कडू, विद्याताई काठोळे, मुख्याध्यापक निर्मळ सर, संजय काशिवार, नंदकिशोर खडसे, वलगावचे सरपंच श्री उगले, शांतीलाल महाजन, अजीज शेख, राजेंद्र इंगोले, मुनीराज कुथे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिशन च्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी विकास खारगे व जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन माळकर यांनी केले तर संपूर्ण संचालन मिशन आय ए एस चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले तर आभारप्रदर्शन मा. चंद्रशेखर मुरादे यांनी केले.
