आयटीआय ओरोस येथे ऑगस्ट 2026 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू
सिंधुदुर्गनगरी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2026 करिता मंजूर असलेल्या Dress Making, Front office, food production General, Mechanic Diesel, welder या व्यवसायाकरिता प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. 21 मे 2026 पासून ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रवेशास इच्छुक उमेदवारांनी प्रथम नजीकच्या आयटीआयमध्ये भेट देऊन कागदपत्रांसहीत प्रवेश प्रक्रीयेसंबंधीची परिपूर्ण माहिती घ्यावी. त्यांनतर आपले अर्ज व अर्जाचे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रत पडताळणीकरीता मुळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्सप्रतींसह दिनांक 21 मे 2026 पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यालयीन वेळेत हजर रहावे. उमेदवारांचे अर्ज तपासणी करुन अर्ज निश्चित केला जाईल व त्याबाबतची पावती दिली जाईल.
अर्ज निश्चित (confirm) नंतर उमेदवारांने प्रवेशासाठी आपल्या पसंतीनुसार ट्रेड विकल्प दिनांक 1 जून 2026 पासून भरावेत. इ. 10 वी ची गुणपत्रिका (Marksheet) शाळांमार्फत वितरीत करण्यांत आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक घोषित केले जाईल. तरी प्रवेशाच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, मु. सिंधुदुर्गनगरी, ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग दूरध्वनी क्र. 02362 29808 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9422596034,9890709119,9420910912 वर संपर्क साधावा.
