You are currently viewing सुट्टी

सुट्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुट्टी*

 

आनंदाने हासत नाचत आली सुट्टी

मज्जा मज्जा करण्यासाठी झाली सुट्टी

 

आबा आजी, मामा मामी लाड केव्हढे

आजोळीच्या प्रेमामध्ये न्हाली सुट्टी

 

खेळ निघाले खूप अनोखे जुने पुराणे

मित्रांना मग खूप हाकारे घाली सुट्टी

 

नवी पुस्तके घरात आली कोरी कोरी

पाहुन अभ्यास नववर्षाचा भ्याली सुट्टी

 

सर वळवाची सांगत जाई सुटी संपली

इतक्या लवकर कशी संपली साली सुट्टी

 

श्रीनिवास गडकरी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा