You are currently viewing मैत्री बंध

मैत्री बंध

*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*मैत्री बंध* 

 

मित्रांनो सहज आठवलं आणि थोडंसं लिहावं असं वाटलं. विषय खूप सोपा आहे पण विविध कंगोऱ्याने बांधलेला आहे. तसा हा विषय सोपा कधीच नाही.ज्यांनी या विषयावरती विजय मिळवला ती माणसं देऊरुपाला पोहोचल्याच्या अनेक इतिहासात नोंदी सापडतात. त्यामध्ये कुटुंबकर्ता असो, राज्य करता असो, धम्म प्रचारक असो, धर्मरक्षक असो. की राष्ट्र निर्माण करणार, राष्ट्र जतन करनारा,विचार पेरणारा. ज्यांना ज्यांना मित्र जपता आले किती माणसं मोठी झाली. ती समाजात मोठी झाली.ती राज्यात मोठी झाली.ती त्या देशात मोठी झाली आणि जगावरती प्रेम करून अजरामरही झाली.दोन उदाहरण देऊन आपण विषयाकडे वळणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांचा मित्र कवी कलश.मित्रांनी मित्रासाठी केलेले बलिदान म्हणजे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज. यावर खूप लिहिण्याची गरज नाही.आपण सुज्ञ आहात इतिहासाचं पानना पान आपणास माहिती आहे. दुसरे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय.छोट्या छोट्या सवंगड्यांना घेऊन रायरेश्वराच्या महादेव मंदिरामध्ये अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन शिवस्वराज्य, रयतेचं राज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजी. केवळ विचारातून निर्माण केलेली मैत्री मित्राच्या शब्दाखातर स्वतःचं बलिदान करणारे हजारो मावळे मित्र निर्माण केले..त्या मैत्रीची उंची मोजणे आज तरी नक्की कठीण आहे.अनेकांची मन ओळखणे, त्यांच्या भावना ओळखणे, त्यांचे विचार ओळखणे, त्यांचे स्वभाव ओळखणे, त्यांच्या आवडीनिवडी ओळखणे आणि त्या सर्व सांभाळत सांभाळत नाती निर्माण करणे, जतन करणे आणि वृद्धिगत करणे. ही सोपी गोष्ट कधीच नाही.आपल्याला आपल्या घरातील लहान थोर माणसं संभाळता सांभाळता नाकी नव येतो तर अनेक ठिकाणचे, अनेक विचाराचे मित्र जोडणे त्यांना संभाळणं,त्यांच्यासोबत रमण, त्यांच्या कलागुणांना विकसित करणे, जतन करणे हे सोपं काम कधीच नाही आणि हे ज्यांना जमलं ती माणसं मोठी झाल्याचे दिसते.खऱ्या अर्थाने यातूनच एक नव्या विचाराची, समाजाची निर्मिती होत असते.

एक म्हण आहे ज्यांना भरपूर मित्र असतात तो राजा माणूस असे म्हटले जाते.आपण स्वतःकडे वळून पाहताना खरंच आपल्याकडे मित्रगण किती आहेत. जीव लावणारे मित्र किती आहेत.स्वार्थी मित्र किती आहेत. नातं जपण्याचे वलय निर्माण करणारे किती आहेत आणि जेव्हा संकट येते तेव्हा धावून येणारे किती आहेत. यावरून आपल्या कर्माची उंची ठरते. हे जरी मित्र नात्यातले विविध प्रकारचे कंगोरे असले तरीही त्यांना सांधता बांधता येणारं मन आपल्याकडे असले पाहिजे आणि हे ज्यांना जमलं ती माणसं अर्थातच खूप मोठी झाल्याची दिसते आहे.

ज्यांना जास्त मित्र तो माणूस सुखी असतो, निवांत असतो, बिंदास्त असतो त्याला कशाचीही काळजी नसते,कारण सुका दुखात समर्थन करणारे मित्र सोबत असले की कुठलीही संकट असो ती सहज तारून जाता येतात. सुखामध्ये मस्तीचा माहोल तयार होतो.आनंदच्या कार्यक्रमात तुमच्या सोबत मित्रपरिवार असतो. ऊन वादळात सुद्धा त्यांची साथ असते आणि म्हणून हा प्रपंच जो आहे तो प्रपंच सहज तारून जातो. म्हणून मित्रांनो अनेकांशी मैत्री करा. अबोल त्यांना बोलत करा. दुःखीताना हसते करा. पिढीताना सावली निर्माण करून त्याच्यासोबत काही क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. मग आपल्या भोवती आनंदाची सावली निर्माण होईल. खऱ्या अर्थाने प्रपंच करून परमार्थ करणे म्हणजे काय असतं तर ते हेच असतं, लाखो मित्र सोबत असावे आणि मग जगण्याला,फिरण्याला,बोलण्याला एक चांगला असा अर्थ निर्माण होऊन जातो.

चला तर नव्या नव्या विचारांच्या मित्रांना एकत्र करून त्यांची मैत्री करू आणि जमल्यास सामाजिक बदलण्याच्या उपक्रमांना त्यांना सोबत घेऊन जाऊ.

 

*चिंतन:- भूमिपुत्र वाघ*

प्रतिक्रिया व्यक्त करा