*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लावणी*
*लग्नाचे झाड*
रायाssलावा लगनाचे झाड
पुरवा माझे जनमाचे लाड ।।धृ।।
मी तर आली वयात आज
अंग अंग हे भरलं माझं
घाला तुम्हीच त्याला साज
अबोल गजरा हारच जाड ।।१।।
आता जवानी दाटु लागली
चोळी माझी आटु लागली
मनात हुरहुर वाटु लागली
तुम्हास ही वाटावी चाड ।।२।।
मिठी हवी हो नाजुक तुमची
तृप्त करा ना तृषा हो अमुची
जग वसवाया अपुले समुची
स्नेह राहु द्या मधाळ गाढ ।।३।।
*सर्वस्पर्शी*
*© कविवर्य वैद्यराज भूपाल देशमुख*
*नाशिक ९८२३२१९५५०*
