You are currently viewing माय

माय

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी लेखिका कवयित्री अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माय*

 

साधीसुधी माय माझी

खेडूत अडाणी

माझ्यासाठी खाये खस्ता

फिरे रानीवनी

 

उन्हातान्हामधी माय

काट्यातून जाई

घरासाठी दैन्याचिही

पूर्वा केली नाही

 

 

माय करते निंदणी

कापणी काढणी

गवताचे भारे माय

डोईवरी आणी

 

 

माय माझी मला म्हणे

खूप शिक पोरी!

शहरामधी जाऊनी

कर तू नौकरी !

 

 

पाटी पुस्तक घेऊन

जाते मी साक्षात

तवा माय होते खूश

हासते गालात

 

 

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा