You are currently viewing दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.६६ टक्के
Oplus_16908288

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.६६ टक्के

२९९ पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण; कला, विज्ञान व वाणिज्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

 

कुडाळ / (प्रतिनिधी):

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य के. शशिकांत अण्णाकर सर विद्यालयाची इयत्ता बारावी (एच.एस.सी.) २०२६ चा निकाल ९८.६६ टक्के इतका लागला आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण २९९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.६६% लागला.

शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी

कला विभाग:

प्रथम: कु. साक्षी सुरेश वरक – ५२२ गुण (८७.००%)

द्वितीय: कु. रेणुका राजन पावसकर – ४३८ गुण (७३.००%)

तृतीय: कु. ऐश्वर्या शिलवंत दुर्वे – ४३१ गुण (७१.८३%)

 

विज्ञान विभाग:

प्रथम: कु. वासुदेव विनायक बिले – ५०८ गुण (८४.६७%)

द्वितीय: कु. भक्ती नागेश आईर – ४९९ गुण (८३.१७%)

तृतीय: कु. वंदना मंगेश पवार – ४९६ गुण (८२.६७%)

 

वाणिज्य विभाग:

प्रथम: कु. प्राची प्रविण कदम – ५११ गुण (८५.१७%)

द्वितीय: कु. निशांत संतोष परब – ४९६ गुण (८३.५०%)

तृतीय: कु. तन्वी संदीप शेलटे – ४८७ गुण (८१.१७%)

 

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आप्पा गावडे, सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, संस्थेचे पदाधिकारी, संचालक तसेच मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा