You are currently viewing प्रमोद जठार यांनी खा. नारायण राणे यांची घेतली भेट
Oplus_16908288

प्रमोद जठार यांनी खा. नारायण राणे यांची घेतली भेट

विधानपरिषद उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले शुभाशीर्वाद; राणेंकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा

कणकवली :

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.

विधिमंडळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्यापूर्वी जठार यांनी राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत पुष्पगुच्छ प्रदान करून आशीर्वाद दिले.

या भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जठार यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा