*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम अभंग*
*मन*
मन आहे शुद्ध/मन हे नितळ/
मनची निर्मळ/ शुद्ध भाव//१//
मन हेचि ध्यान/मनाचे ऐकावे/
मनाचे करावे/ चित्त शुद्ध//२//
मन माझे राम/ मन माझे शाम/
सदा मुखी नाम/ रामराम//३//
मनाचा विकार/मनाला स्विकार/
मना अधिकार/कोण जाणे//४//
मनाचा आदर/ सावरे तनाला/
आवर मनाला/कोण घाली //५//
मनाचीच प्रीती/मनालाच भिती/
मनाचे सोबती/ कोण आहे//६//
चंद्रू म्हणे कोण/मनाचा मालक/
जगाचा चालक/ पांडुरंग//७//
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
