You are currently viewing डोंबिवलीत रंगले शब्दसाजचे ३रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

डोंबिवलीत रंगले शब्दसाजचे ३रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

डोंबिवली / (बबनराव आराख) :

डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राजस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले.

वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या सदर साहित्य संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते. सुनीता परब आणि त्यांच्या चमूने स्वरचित स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. योगिता खानविलकर आणि संगीता कासले यांनी सुबक व सुरेख रांगोळी साकारून सारस्वतांची नेत्रांची पारणे फेडली.

ज्येष्ठ साहित्यिक वाणी वेणूमाधव केरकलमट्टी यांनी तिसऱ्या भव्य दिव्य साहित्य संमेलनाचे अधक्ष्यपद भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक रमेश पाटील यांनी पदभार सांभाळला. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात काव्यगंध प्रकाशनाच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि संमेलन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. ज्यात शब्दसाज विशेषांक (प्रातिनिधिक विशेषांक ), शब्दांकुर (श्री विनोद डंबे लिखित काव्यसंग्रह ), व काव्यामृत (श्री. रघुनाथ भिसे लिखित काव्यसंग्रह ) समाविष्ट होते. प्रत्येक सारस्वताने मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितेच्या सरी सभागृहात बरसवल्या.

या संमेलनात एक आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे सन्माननीय संतोष जाधव आणि सन्मानीय मानसी आंब्रे यांनी सादर केलेल्या ‘सखाराम बाइंडर’ या जेष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या लघुनाटिकेचे काही क्षण.

सदर कार्यक्रमास लाभलेले आयोजक व नियोजक मंडळ यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम बहारदार आणि उत्स्फूर्त पणे पार पडला, त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मानाचे शिलेदार म्हणून गौरविण्यात आले. ज्यामध्ये मुख्यत्वे अविनाश ढळे, योगिता खानविलकर, प्रियांका कुटे, सुनीता परब, विद्या थोरात, इंदिरा शिंगणे, रघुनाथ भिसे, विनोद डंबे, संगीता कासले आणि संतोष जाधव यांचा समावेश होता. संतोष जाधव, स्मिता शिंदे, जीवा मोरे, विवेक जोशी आणि विकास पाटील यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शब्दसाज साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या काव्य अभिवाचन स्पर्धेचा विजेता पुरस्कार सुनीता परब आणि दीपाली साबळे यांना प्राप्त झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा