You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम; माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग

फोंडाघाट

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचा ७४ वा वर्धापन दिन आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी टेनिस बॉल ग्राउंडचे उद्घाटन गटनेते संजय आग्रे आणि चेअरमन राजू पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंदाचे संपूर्ण वर्ष ‘अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
सोसायटीची स्थापना १९५६ साली झाली असून यावर्षी संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर शाळेतील आठवणी व अनुभव शेअर केले जात आहेत.
दरम्यान, संस्थेचे माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी कार्यक्रमास भेट देऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा