You are currently viewing वेंगुर्ला वजराट येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
Oplus_16908288

वेंगुर्ला वजराट येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम; रस्ते, ट्रान्सफॉर्मर व शाळा दुरुस्ती कामांना मंजुरी

 

वेंगुर्ला :

वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून या कामांचे भूमिपूजन सोमवारी (२७ एप्रिल) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

ग्रामपंचायत वजराट अंतर्गत इलेक्ट्रिक २० पोलचे कन्वर्जन करण्यासाठी ५ लाख रुपये निधी, वजराट परववाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी १७ लाख रुपये निधी, तसेच वजराट चव्हाटा मंदिर ते पळताड परववाडी येथे रस्ता मजबुतीकरणासाठी ५ लाख रुपये आणि पिंपळगाव उदवगरीवाडी येथे रस्ता मजबुतीकरणासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच वेंगुर्ला पंचायत समिती सेस फंडातून पिंपळगाव शाळा दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या विकासकामांचा शुभारंभ मनीष दळवी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, तालुका चिटणीस नितीन चव्हाण, प्रमुख गावकर सूर्यकांत पुंडलिक परब, वजराट श्री गिरेश्वर सोसायटीचे व्हॉईस माजी चेअरमन बाबुराव उर्फ तात्या परब, वजराट सोसायटी व्हाइस चेअरमन दत्तात्रय उर्फ अण्णा वजराटकर, माजी सरपंच महेश राणे, माजी उपसरपंच नितीन परब, वामन भोसले, प्रवीण कांदे, वसंत परब, माजी सरपंच रमेश राणे, महेश राणे, राजन परब, सोसायटी संचालक सत्यवान सावंत, निवृत्ती घोणे, मंगेश परब, संदीप पेडणेकर, रविंद्र पालयेकर, मेघश्याम परब, शेखर परब, मकरंद गोंधळेकर, संजय केरकर, विजयसिंग परब, जयसिंग देसाई, सत्यवान सावंत तसेच मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा