मालवणात २ मे रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत; विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे
राकेश परब मित्रमंडळाचे आयोजन; ‘बकासुरा’ पाहण्याची खास संधी, ३५ हजारांचे पहिले बक्षीस
मालवण :
राकेश परब मित्रमंडळाच्यावतीने शनिवारी, २ मे रोजी दुपारी २ वाजता मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे (वर्ष दुसरे) आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत राज्यभरातील नामांकित स्पर्धक सहभागी होणार असून, प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रुपये ३५,००० व मानाची ढाल, द्वितीय विजेत्याला रुपये २५,००० व ढाल, तृतीय क्रमांकासाठी रुपये २०,००० व ढाल, तर चतुर्थ क्रमांकासाठी रुपये १७,००० व ढाल असे बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच ५ ते १० क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये १५,०००, १२,०००, १०,०००, ८,०००, ७,००० व ५,००० तसेच मानाची ढाल देण्यात येणार आहे. ११ ते १५ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी रुपये २,००० व मानाची ढाल प्रदान केली जाणार आहे.
या शर्यतीचे खास आकर्षण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात अव्वलस्थानी असलेला ‘बकासुरा’ बैलगाडा प्रत्यक्ष पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीप्रेमींसाठी हा सोहळा पर्वणी ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी दया देसाई (९४०४३९६२००) व संतोष मुणगेकर (७०२०६६४७३४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
