You are currently viewing सिंधुदुर्गात ‘युवाशक्ती जागर यात्रा’चा उत्साह

सिंधुदुर्गात ‘युवाशक्ती जागर यात्रा’चा उत्साह

कृष्णराज महाडिक यांची नितेश राणेंशी सदिच्छा भेट

कणकवली :

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरण, युवा मोर्चाच्या आगामी उपक्रमांची आखणी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृष्णराज महाडिक यांच्या आगमनावेळी जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जि.प. सदस्य मनोज रावराणे, लखमराजे भोसले, श्वेता कोरगावकर, मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, संतोष पुजारे, प्रज्वल वर्दम, सागर राणे, राज नलावडे, गणेश तळगावकर यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा