You are currently viewing रित्या मुठीत माझ्या…!

रित्या मुठीत माझ्या…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रित्या मुठीत माझ्या…!*

 

रित्या मुठीत

माझ्या दोन क्षण

हसरी आठवण

सोबतीला…!

 

चंद्र नभीचा

जेव्हा चांदण्यात लपला

जरा विसावला

मुठीत…!

 

रित्या मुठीत

पकडला कवडसा उन्हाचा

किरण आशेचा

मनात…!

 

दान द्यावे

आज भुकेलेल्या पामरास

दोन घास

मुठभर…!

 

समाधान भरून

मुठीनेच मुठीला द्यावे

दान मिळावे

ईश्वराचे…!

 

रित्या मुठीत

माझ्या अक्षरधन भरलेले

आज कळले

गुपित…!

 

मुठ माझी

रिती कशी म्हणावी

कृतार्थ व्हावी

दानाने…!

 

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा