You are currently viewing एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

लोणी-काळभोर (पुणे) :

एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

सदर स्पर्धा बँटमवेट, लाईटवेट, वेल्टरवेट, लाईट मिडलवेट, मिडलवेट, लाईट हेवीवेट, क्रूझरवेट आणि हेवीवेट अशा विविध वजन गटांत झाली. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा कॅप्टन गोपाल देवांग तसेच ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.नचिकेत ठाकूर, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, डॉ. अतुल पाटील आदी उपस्थित होते.

स्पर्धेअंती सर्व वजन गटांतील विजेत्यांना सुवर्णपदके व उपविजेत्यांना रौप्यपदकांसह तब्बल एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

या स्पर्धेत राज्यातील युवा विकास मंच, मनोज पिंगळे क्रीडा अकादमी, नॉकआउट बॉक्सिंग अकादमी, मुंबई बॉक्सिंग अकादमी, स्टार बॉक्सिंग अकादमी, कोंढवा बॉक्सिंग अकादमी, खराळवाडी बॉक्सिंग अकादमी, के.डी. बॉक्सिंग अकादमी, बीएमएसए अकादमी, बीव्हीजीपी बॉक्सिंग अकादमी तसेच डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमी आदी नामांकित अकादमींच्या मुष्ठीयोद्ध्यांनी सहभाग घेतला आणि निकराच्या लढती रंगवल्या.

स्पर्धेअंती मिडलवेट गटात (७० ते ७५ किलो) के.डी. बॉक्सिंग अकादमी मुंबईच्या मिथेश राठोड याला ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ तर हेवीवेट गटात (८५ ते ९० किलो) एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आर्या औटी याला ‘सर्वोत्कृष्ट चॅलेंजर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

========================

*संवाद मीडिया*

*🚗 करिअरची सुवर्णसंधी! 🚗*

*माई ह्युंदाई (Mai Hyundai)*

*27 वर्षांचा विश्वास • सततची प्रगती • उज्ज्वल भविष्य*

* माई ह्युंदाई (Mai Hyundai) तर्फे कुडाळ आणि कणकवली येथील शोरूमसाठी उत्साही आणि कुशल उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

*📌 उपलब्ध पदे:*

*▪️ सेल्स एक्झिक्युटिव्ह*
*▪️टीम लीडर*
*▪️सर्व्हिस ॲडव्हायझर*
*▪️CRM (सेल्स)*
*▪️CRM (सर्व्हिस) मॅनेजर*

*👉🎓 पात्रता:*

*पदवीधर / डिप्लोमा / पदवीधर उमेदवार*
*अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात*

*💼 सुविधा:👇*

*✔ प्रोव्हिडेंट फंड (PF)*
*✔ ग्रॅच्युटी*
*✔ वार्षिक बोनस*
*✔ मासिक इन्सेंटिव्ह*
*✔ ट्रॅव्हलिंग भत्ता*.

*📍 कामाचे ठिकाण:*

*Mai Hyundai*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागडे, कणकवली*

*Mai Hyundai, उद्योगनगर, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ*
*📅 अर्ज कसा कराल?👇*

*👉 इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडेटा व फोटोसह*
*🕙 सकाळी 10 ते 🕕 संध्याकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी*

*📞 संपर्क:*

*📱 74100 06037*

*📧 tmsnd@maihyundai.in*

*✨ 27 वर्षांचा विश्वास – Mai Hyundai सोबत उज्ज्वल करिअर घडवा! ✨*

*(नियम व अटी लागू)*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/202054/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा