You are currently viewing न्हावेलीत २६ एप्रिलला भव्य बैलगाडा शर्यत; ‘पर्व ३ रे’चा थरार रंगणार

न्हावेलीत २६ एप्रिलला भव्य बैलगाडा शर्यत; ‘पर्व ३ रे’चा थरार रंगणार

न्हावेलीत २६ एप्रिलला भव्य बैलगाडा शर्यत; ‘पर्व ३ रे’चा थरार रंगणार

राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धा; आकर्षक रोख बक्षिसांसह बैलगाडा प्रेमींची उत्सुकता

सावंतवाडी – न्हावेली (प्रतिनिधी):
कोकणच्या मातीतील साहसी आणि पारंपारिक खेळ म्हणून ओळखली जाणारी बैलगाडा शर्यत २६ एप्रिल रोजी न्हावेली येथे रंगणार आहे. सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेला हा क्रीडा प्रकार ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय असून, गेल्या तीन वर्षांपासून श्री. आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली यांच्या वतीने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
यंदाचा ‘पर्व ३ रे’ अंतर्गत होणारा हा थरारक सोहळा रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजल्यापासून न्हावेली येथील कुंभारभाट मैदान (चाळणी) येथे पार पडणार आहे. स्पर्धेत विविध गटांसाठी आकर्षक रोख बक्षिसे आणि ढालींची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय गटासाठी प्रथम पारितोषिक २२,२२२ रुपये असून, एकूण १० क्रमांकांपर्यंत बक्षिसे दिली जाणार आहेत. जिल्हास्तरीय गटात प्रथम पारितोषिक १२,००० रुपये आहे. तालुकास्तरीय गटासाठी प्रथम ७,००० रुपये आणि ६ क्रमांकांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत, तर गावटी गटासाठी प्रथम ७,००० रुपये आणि ५ क्रमांकांपर्यंत बक्षिसे असतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलांसाठी ‘लंपी’ लसीकरण प्रमाणपत्र, मालकाचा रंगीत फोटो व आधार कार्डची झेरॉक्स अनिवार्य करण्यात आली आहे. नावनोंदणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत केली जाणार आहे. ही स्पर्धा शासनाच्या अटी व शर्तींनुसार विना फटाका पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक मालकांनी आनंद नाईक (९४२०२०५२४१) किंवा बंटी नाईक (९४२२९०८०२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या निमित्ताने न्हावेली परिसरात बैलगाडा प्रेमींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा