You are currently viewing सिंधुदुर्गात दिव्यांग हक्कांसाठी हक्क समिती सक्रिय; अनिल शिंगाडे जिल्हाध्यक्षपदी

सिंधुदुर्गात दिव्यांग हक्कांसाठी हक्क समिती सक्रिय; अनिल शिंगाडे जिल्हाध्यक्षपदी

सिंधुदुर्गात दिव्यांग हक्कांसाठी हक्क समिती सक्रिय; अनिल शिंगाडे जिल्हाध्यक्षपदी

राज्याध्यक्ष बापू काणे यांचे आवाहन; जिल्हा-तालुकास्तरावर विस्तारासह कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे निमंत्रण

सिंधुदुर्ग :

दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणित हक्क समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असून, दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यभरात कार्यरत असलेल्या या समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांना त्यांच्या हक्कांबाबत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, अनिल शिंगाडे यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील काळात त्यांनी जिल्हा तसेच तालुकास्तरावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून संघटनेचा विस्तार वाढवावा आणि दिव्यांग बांधवांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापू काणे यांनी केले आहे.
तसेच, ज्या दिव्यांग बांधवांना या समितीत कार्य करायचे आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९७६५९७९४५० असा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा