*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलमोहर*
रसरसत्या झेलीत अग्निज्वाला
अंगावरी लीलया खेळवितो
वाटसरुना जरा विसावता
शीतल सावलीत बहरवतो.
पीत, केशरी, लाल रंगाची उधळण
हिरव्या पर्णावरी अलगद झुलवतो
निसर्ग किमया न्यारी विरोधाभास
हा असताही रमणीयतेने मोहरतो.
तप्तता भरली दाहीदिशाना तरी
उन्हात गुलमोहर स्वागत करतो
अग्निज्वालेत स्वतः रसरसताना
दुसर्यांस थंडावा देत हसत रहातो.
याच्या उदारतेसम असावीआपली
माणुसकीची जाण निस्वार्थ भावना
नीलाकाशी हर्षे झेपावति पाकळ्या
जगती संदेश तेवता उत्स्फुर्त प्रार्थना.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
क़लाशिक्षिका.
