You are currently viewing चावी

चावी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*

 

*चावी*

 

रायानं हौसेनं आणली साडी चोळी नवी

माझ्या कपाटाची हरवली कुठंतरी चावी ||धृ||

 

प्रेमाने भरलीया, मदनाची मंजीरी

अत्तरानं गंधाळली ज्वानीची तिजोरी

कुणावर भाळली या नवतीची छवी

माझ्या कपाटाची हरवली कुठंतरी चावी ||१||

 

इश्काचं कबूत्तर फडफड करतंय

इथ तिथं कुठं कुठं उडूउडू पहातंय

पिंजऱ्यातील पाखराला मोकळीक हवी

माझ्या कपाटाची हरवली कुठंतरी चावी ||२||

 

डावा डोळा मारून पुढे सरकत या ना

साडीचा पदर ओढा करून बहाना

मिठीत घ्या ओढून गावल कमरेत शोधावी

माझ्या कपाटाची हरवली कुठंतरी चावी ||३||

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा