You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी तालुक्यातील महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी तालुक्यातील महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :

आरोंदा पंचशीलनगर येथील प्रज्ञा, चैतन्य व प्रगती महिला बचत गट यांच्या वतीने महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इच्छुक महिला समूहांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक २४एप्रिल २०२६ रोजी, दुपारी ३.०० वाजता समाजमंदिर, आरोंदा पंचशीलनगर येथे होणार आहे. स्पर्धा महिला समूहांसाठी असून सामाजिक प्रबोधनपर भीमगीतांना प्राधान्य दिले जाणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रु. ५,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ३,०००, तृतीय क्रमांकासाठी रु. २,००० तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून रु. १,००० व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून प्रत्येक समूहात ५ ते १० महिला असाव्यात, गीत ६ ते ७ मिनिटांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश फी रु. १०० असून नाव नोंदणी दि. २३ एप्रिल पर्यंत करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संजना जाधव (७२६४०३७८२२) व सिद्धार्थ जाधव (९६३७९०९२५२) यांच्याशी संपर्क साधावा. सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक महिला समूहांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा