You are currently viewing डोळे ..मिटता मिटता ..!!

डोळे ..मिटता मिटता ..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*डोळे ..मिटता मिटता ..!!*

 

कुणाच्या आड न येता

आताश्या.. उजाडत होतं

तुळशीपत्राचं जड ओझं

डोळ्यावर …जमलं होतं..

 

डोळ्यांत साचलेली नाती

सभोवती ओघळत होती

उणेपण सुखाचं..क्षणार्धात

उठायला …..सांगत होती..

 

स्वप्न होतं की काय

तेही ..कळालचं नाही

कळायला उशीरच झाला

आता.. जागही येत नाही..

 

दूर अवकाशांत एक फूल

नव्याने.. उमलत आहे

डोळे मिटता -मिटता तेही

पुन्हा… जन्म घेत आहे ..

 

स्वातंत्र्याचा गंध येताच

रक्तालाही पान्हा फुटतो

अश्यावेळी आपण सारे

एकाचं वयाचे होतो..!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा