NAB नेत्र रुग्णालयाचा वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
30 मे 2026 पर्यंत रुग्णांना मोफत सेवा; अल्प दरात चष्मे उपलब्ध
सावंतवाडी
भटवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयाने आपल्या चौथ्या वर्षात पदार्पण केले असून, यानिमित्त गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात पार पडली. या धार्मिक कार्यक्रमानंतर संध्याकाळी साडेचार ते साडेसात या वेळेत तीर्थप्रसादासाठी अनेक नागरिक उपस्थित होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णालयाच्या वतीने दिनांक 30 मे 2026 पर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना अत्यंत अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रुग्णालयाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन NAB नेत्र रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
