You are currently viewing योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’

योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’

योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’

सावंतवाडी

फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय योगसेवेबद्दल ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील ए. डी. फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
श्री. बांदेकर गेल्या सहा वर्षांपासून विविध गावांमध्ये जाऊन योगशिबिरे आयोजित करणे, नियमित योगवर्ग घेणे तसेच योगाभ्यासाबाबत जनजागृती करण्याचे कार्य निस्वार्थी आणि निःशुल्क पद्धतीने करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे समाजामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित झाले असून योग क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातूनही ते योगसेवा देत असल्याने त्यांना एक उत्तम योगशिक्षक म्हणून ओळख मिळाली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. मुंबईचे आयकर आयुक्त श्री. सचिन मोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त सौ. रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गोरड, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. अशोक शिंदे, तसेच अध्यक्ष अशोक गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २० योगसाधकांनीही उपस्थिती दर्शवली. श्री. बांदेकर यांना मिळालेल्या या सन्मानामुळे बांदा, सावंतवाडी, कुडाळ तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा