महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र व स्थानिक सुप्रसिद्ध अशा शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे म्हणजे विदर्भ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री वसंतराव देशमुख यांनी मिशन आयएएसला लेखी शुभेच्छा पाठविल्या आहेत. या शुभेच्छांमध्ये ते म्हणतात की जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा विदर्भात स्पर्धा परीक्षा हा विषय दुर्लक्षित होता. आम्हाला स्पर्धा परीक्षांबाबत काहीही माहिती नव्हती. आम्ही अंधारात धडपडत होतो. परंतु मिशन आय.ए.एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जी जनजागृती केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण गेल्या 26 वर्षात चांगला तयार झालेला आहे. सतर्क झालेला आहे. याचे श्रेय निश्चितच मिशन आयएएसला द्यावे लागेल. मिशन आयएएसचे सगळेच उपक्रम चांगलेच असतात. मी वेळोवेळी या उपक्रमांना शुभेच्छा देत असतो. मिशन आयएएसने 16 मे ते 22 मे या दरम्यान अमरावतीच्या सिकची रिसॉर्टमध्ये होणाऱ्या निवासी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे निमंत्रण मला पाठविले ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची बाब आहे. मला देखील माझ्या मातृभूमी मध्ये येणे आवडते.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी एक सूचना आहे. त्यांनी त्यांचा बी प्लॅन तयार ठेवला पाहिजे .प्रत्येकच विद्यार्थ्याला यश मिळतेच असे नाही आणि त्याचा बी प्लान तयार नसेल तर त्याला अवघड होऊ शकते म्हणून बी प्लॅन डोळ्यासमोर ठेवूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. आमच्या तेव्हाच्या तुलनेत आजचा विद्यार्थी खरोखरच भाग्यवान आहे .कारण त्याला स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांना माझी काही मदत लागली तर ते करण्यास मी सदैव तत्पर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्ष असलेल्या श्री वसंतराव देशमुख यांनी मिशन आयएएसच्या रौप्य महोत्सवी वर्षात दिलेल्या ह्या शुभेच्छा सर्वांना समाधान देणाऱ्या आहेत. श्री वसंतराव देशमुख हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे राहणारे असून खूप विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र शासनाची व केंद्र शासनाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. एक कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
