You are currently viewing बालपणाची पाटी

बालपणाची पाटी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बालपणाची पाटी*

 

बालपणाची पाटी

काळ्याशार छान दगडाची

लाकडी चौकटीची

सुंदर….

 

दप्तरात ठेऊन

रोज पाटीसोबत लेखणी

अक्षरांची आखणी

त्यावर….

 

पाटीवर झाला

शिक्षणाचा छान श्रीगणेशा

अक्षरांनी सुबकशा

प्रारंभ….

 

लिहायचं पुसायचं

चित्र छान काढायचं

पुन्हा मिटायचं

खेळच….

 

कोळशाने घासून

पाटी लख्ख धुवायची

उन्हात वाळवायची

अभ्यासासाठी….

 

कधी कधी

पाटी जायची फुटून

गोंधळ रडून

घालायचा….

 

नवीन पाटी

सुंदर रंगीत मण्यांची

मैत्रिणीत मिरवायची

आनंदाने…..

 

वर्ग भराभर

चढत जशी गेली

पाटी सुटली

हातातून….

 

सुविद्य झालो

पाटीवर अक्षरे गिरवून

तिला आठवून

नमन….!!

 

॰~~~~~~~~~~~~~

*अरुणा दुद्दलवार*

प्रतिक्रिया व्यक्त करा