You are currently viewing कणकवलीत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या जिल्हा व युवक आघाडी कार्यकारणीची बैठक

कणकवलीत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या जिल्हा व युवक आघाडी कार्यकारणीची बैठक

कणकवलीत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या जिल्हा व युवक आघाडी कार्यकारणीची बैठक

१२ एप्रिल रोजी बैठक; विजय कोकरे, नवलराज काळे, विजय खरात व संतोष साळसकर यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्ग :

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली – महाराष्ट्र राज्य, कोकण प्रदेश यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य आघाडी व युवक आघाडी कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १.३० वाजता सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या विश्रामगृहात, प्रहार कार्यालयासमोर हायवे नजिक पार पडणार आहे.
प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीस प्रदेश संघटक विजय कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हाध्यक्ष विजय खरात तसेच जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष संतोष साळसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अमोल बाळकृष्ण जंगले यांनी केले आहे.
या बैठकीत नवीन जिल्हा मुख्य आघाडी व युवक आघाडी कार्यकारणीची अधिकृत घोषणा, कार्यकारिणी अध्यक्ष निवड, प्रवीण काकडे यांच्या फेरनिवडीबाबत अभिनंदन ठराव तसेच जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. याशिवाय धनगर समाजासमोरील विविध समस्या, शिक्षण सुधारणा, दळणवळण सुविधा, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम, आर्थिक नियोजन आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
बैठकीदरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण व सन्मान करण्यात येणार असून, अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवरही चर्चा होणार आहे.
अधिक माहितीसाठी विजय खरात (मो. ९५७९८९८२४९) व संतोष साळसकर (मो. ७३५०२१९५२५) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा