You are currently viewing एका क्षणात

एका क्षणात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एका क्षणात*

 

घडतं अघटीत

अगदी एका क्षणात

आशा मालवतात

मनाच्या…!!१

 

एका क्षणात

वादळ उठतं सागरात

लाटा खवळतात

विक्राळ….!!२

 

चक्री वादळ

उठते एका क्षणात

वणवा जंगलात

पेटतो….!!३

 

लहरी निसर्ग

क्षणात पाऊस ऊन

जाते हरकून

सृष्टी…‌!!४

 

क्षणातली दृष्टीभेट

व्याकुळ करते मन

भेटीचं कारण

निश्चित….!!५

 

श्रावणाची सर

क्षणभर करते ओलीचिंब

दिसते प्रतिबिंब

जळात….!!६

 

बघता क्षणभर

भगवंताची मूर्ती देव्हारी

ह्रदय गाभारी

प्रसन्नता….!!७

 

एकच क्षण

पुरतो द्यायला आनंद

जीवनाचा कंद

जोपासत….!!८

०००००००००००००

 

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा