*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चिऊताईचे लग्न*
चिऊताईचे लग्न ठरले
वनात वार्ता पसरली
सारे पाखरे पक्षांची
धावपळ सुरू झाली
हत्तीने मंडप उभा केला
इतरांनी केली रोषणाई
वऱ्हाड मंडळींची गर्दी झाली
सर्वांनी केली लगीनघाई
लांडगा कोल्हा अस्वल
स्वयंपाक यांनी केला
खारूताई केलें लाडू
ससा उभा मदतीला
चित्ता होता कारभारी
वाघोबा बसला शेजारी
हरिण उभा सजून सुंदर
सिंह राजा म्हणे मी मानकरी
कावळोबाने बडवला ढोल
मोर थुई थुई नाचला
सारे सखे सवंगडी सोबती
माकडाने ही ठेका धरला
वरात आली दारात
पळापळ सुरू झाली
पोपटाने दिल्या शुभेच्छा
मैना स्वागताला आली
वर आला चिमणा राजा
फुलांचा घातला हार
चिऊताई लाजून हसली
डोळ्यात तिच्या प्रेम फार
चिऊताईच्या लग्नाला
चांदण्यांनी उजळली रात्र
आतषबाजीने उजळले आसमंत
आले सारे गणगोत आले सारे मित्र
फुलांनी सजला मांडव
पाखरांनी गाईले गाणे
चिऊ चिमणाचे झाले लग्न
पाखरे म्हणाले घ्या आता उखाणे
नाचगाणी हशा आणि खेळ
रंगला सुंदर सोहळा साज
चिऊताईच्या लग्नाची ही गोष्ट
सर्वांच्या आठवणीत राहिली आज
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
