*दि.१२ एप्रिल रोजी ओरोस येथे ग्राहक पंचायतची सभा*
वैभववाडी
अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्राहक राजाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा मुख्यालय ओरोस येथे संस्थेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.एस. एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व तालुका शाखा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यात आणि शेकडो तालुक्यात ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सर्व तालुक्यात ग्राहक जागृतीचे कार्य सुरू आहे.
परंतु जिल्हा मुख्यालय ओरोस (सिंधुदुर्गनगरी) आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्थेची स्वतंत्र सिंधुदुर्गनगरी शाखेची मागणी होत आहे. या संदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कुडाळ येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा- २०२६ आयोजित करणे, उर्जा मित्र बैठकांचा आढावा, तालुका शाखा कार्यकारिणी रिक्त पदे भरणे यावर चर्चा केली जाणार आहे. सदर सभा रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ठिक १० वा. जिल्हा संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी “विठाई” विठ्ठल मंदिर जवळ, नुतन सोसायटी (जैतापकर कॅालनी) ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जिल्हा मुख्यालय व परिसरातील सामाजिक क्षेत्रातील आणि ग्राहक चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी श्री. विष्णुप्रसाद दळवी (9869854523) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या जिल्हा शाखेने केले आहे.
