दिव्यांग तक्रारींच्या निवारणासाठी ऑनलाइन सभा
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन (v.c) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तक्रार निवारण समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या दालनातून पार पडणार आहे.
ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली असून, या समितीची दर महिन्याला सभा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याची सभा आयोजित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी मंगळवार, 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या नजीकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.
