सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नव्या लिफ्टचे लोकार्पण
आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन; रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीत बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक लिफ्टचे लोकार्पण आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या सुविधेमुळे रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून रुग्णालयातील सेवा अधिक सुलभ होणार आहे.
यापूर्वी रुग्णालयात लिफ्टची व्यवस्था असली तरी ती अनेकदा बंद स्थितीत राहत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नव्याने लिफ्ट बसविण्यात आली असून ती नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला नगरसेवक देव्या सूर्याजी, नीलम नाईक, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्यासह गौरी गोसावी, प्राची राणे, सुप्रिया नाईक, अमृता मुंगी, हेमांगी रणदिवे, रश्मी नाईक, दीक्षा चव्हाण, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, नीलम पडवळ, प्रशांत सातार्डेकर, अनघा चव्हाण आदींसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
