You are currently viewing मळगाव महिला कॅरम स्पर्धेत नेहा मळगावकर अंतिम विजेत्या

मळगाव महिला कॅरम स्पर्धेत नेहा मळगावकर अंतिम विजेत्या

सावंतवाडी :

मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आणि राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत नेहा मळगावकर विजेत्या प्रतीक्षा गावकर उपविजेत्या ठरल्या.स्पर्धेतील तृतीय क्रमांक तन्वी वालावलकर चतुर्थ क्रमांक संजना खानोलकर यांनी पटकावला.

यावेळी व्यासपीठावर वाचनमंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर उपाध्यक्ष बाबली नार्वेकर राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत खानोलकर सौ. अरुणा सामंत मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच स्पर्धेतील शुभारंभाचा सामना खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करित असलेल्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती सौ .अरुणा सामंत यांनी दिली. मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर यांनी ग्रामीण भागात वाचनालय क्रीडा विषयी उपक्रम तळमळीने राबवित असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा संपताच रमाकांत सूर्याची खानोलकर सभागृहात करण्यात आला. कॅरम स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्यांना राधारंग फाउंडेशन तर्फे रोख पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेतील तृतीय व चतुर्थ विजेत्यांना ग्रंथालया तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. कॅरम स्पर्धेचे परीक्षण प्रणित गोसावी, मधुकर लोके यांनी केले. त्यांना ग्रंथालय तर्फे प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन व आभार कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी केले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, राधारंगचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला ग्रंथालयाचे संचालक शांताराम गवंडे, रितेश राऊळ, तसेच बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा