You are currently viewing वेंगुर्ल्यात “सिंधुरत्न भूषण चषक २०२६” खुली कबड्डी स्पर्धा रंगणार
Oplus_16908288

वेंगुर्ल्यात “सिंधुरत्न भूषण चषक २०२६” खुली कबड्डी स्पर्धा रंगणार

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरेया फाउंडेशन पुरस्कृत १३ व १४ एप्रिलला भव्य आयोजन

महिला-पुरुष गटात आकर्षक बक्षिसे; बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय मैदानावर सामने

वेंगुर्ले / (प्रतिनिधी):

माजी मुख्यमंत्री, भाजप नेते तथा सिंधुदुर्ग–रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वरेया फाउंडेशन पुरस्कृत भव्य अशी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा मर्यादित निमंत्रित संघांची “सिंधुरत्न भूषण चषक २०२६” ही खुली कबड्डी स्पर्धा वेंगुर्ले येथे दिनांक १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी महिला व पुरुष अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने, जय मानसीश्वर कबड्डी संघ, वेंगुर्ले आयोजित ही स्पर्धा वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

महिला गटात विजेत्या संघास रोख २० हजार, उपविजेत्या संघास १० हजार तसेच उपांत्य सामन्यात पराभूत दोन्ही संघास प्रत्येकी ३ हजार रुपये व सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच पुरुष गटात विजेत्या संघास ३० हजार, उपविजेत्या संघास १५ हजार व उपांत्य सामन्यात पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी ५ हजार रुपये व सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत इतर वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत खेळविण्यात येणार असून अधिक माहितीसाठी पंकज शिरसाठ (९६७३५६३२२३), हेमंत गावडे (९४२१२३५१२८) किंवा तुषार साळगावकर (९४०४५१२३८४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा