You are currently viewing आभासाला ..आकार असावा!!

आभासाला ..आकार असावा!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आभासाला ..आकार असावा!!*

 

आभासात आकांक्षा

आभासात कल्पकता

आभासात प्रार्थना

आभासात दिव्यत्वता

 

अश्याक्षणी आभासाला वाटतं

आभासाला आकार असावा

जाणिवेच्या निरंकारी ब्रम्हांत

माझाही…साक्षात्कार व्हावा

 

आभासाच्या वेदना तश्या

कुणालाही …कळत नाही आभासाला आकार नसल्याने

काळजाला कुणी लावून घेत नाही

 

आभासाच प्रतिबिंब

जाणिवेत …असत

आभासाला आकार

मनाच्या ..तळाशी देत..

 

आभासी जग …धुंडाळतांना

कर्मबंधनातून सुटका नाही

आभासाला ..आकार असावा

यातून वास्तवही..मरता मरत नाही

वास्तव..मरता मरत नाही

कर्मबंधनातून सुटका नाही…!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा