You are currently viewing कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता.

कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता.

कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता.

कणकवली

कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघाने नवयुवक तरुण मित्रमंडळ संघावर मात करत विजेते पद पटकावले. विजेता व उपविजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग व महेश मुद्रस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कल्पेश सुद्रीक, संतोष मुरकर, चंद्रशेखर चव्हाण , रविंद्र घोगळे, सागर शिर्के, मधुकर भोगले, सुधीर हळवे, ग्रा. पं. सदस्य नंदकिशोर परब , निलेश वांरग, विशाल लाड आदि उपस्थित होते. हि स्पर्धा ग्रा.पं.सदस्य कल्पेश सुद्रीक यांच्या संकल्पनेतून गेली १३ वर्षे भरविण्यात येत आहे.
स्पर्धेत १८ संघ सहभागी होते. अंतिम सामन्यात नवयुवक तरुण मित्रमंडळ अ संघाने ३ षटकात २७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल लिंगेश्वर कनेडी संघाने यशस्वीरीत्या धावाचा पाठलाग केला. या स्पर्धेत मालिकावीर रितेश(लिंगेश्वर कनेडी ), उत्कृष्ट फलंदाज वैभव मुरकर (नवयुवक तरुण मित्रमंडळ ), उत्कृष्ट गोलंदाज ओमकार (लिंगेश्वर कनेडी) व क्षेत्ररक्षक सुश्रुत वांरग(नवयुवक तरुण मित्रमंडळ) यांनाही गौरविण्यात आले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत कोंकण टाइगर दारिस्ते व लिंगेश्वर कळसुली या दोन्हीही पराभूत संघांनी बहारदार खेळ करून रसिकांची माने जिंकली.
स्पर्धेत पंच म्हणून श्रेयस मुरकर, विपुल घोगळे , गुणलेखण सिद्धांत वांरग व स्वप्निल घोगळे . समालोचन डेविड फर्नांडिस, महेंद्र शिर्के यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरीत्येसाठी सम्राट शिर्के, अक्षय मुरकर, चिन्मय घोगळे, मृण्मय वारंग, रमेश सुद्रीक, प्रथमेश परब, आर्यन शिर्के, आनंद राणे, गणेश चव्हाण, यश लाड, संजय तेली, संजय गोसावी, हर्ष भोगले, अभिषेक शिर्के , उत्कर्ष तेली, बाळकृष्ण पडते, अनिल भोगले, प्रसाद भोगले.

प्रतिक्रिया व्यक्त करा