You are currently viewing कणकवलीत ‘सिंधुनायक चषक २०२६’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कणकवलीत ‘सिंधुनायक चषक २०२६’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मा. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य स्पर्धा; विजेत्यास ५ लाख ७५ हजारांचे बक्षीस

कणकवली / (प्रतिनिधी):

मा. मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात भव्य ‘सिंधुनायक चषक २०२६’ खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ५ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान श्री महादेव मैदान, नाधवडे तळेरे वैभववाडी रोड येथे सायंकाळी ७ वाजता रंगणार असून, तालुक्यातील ८ खेळाडू व ३ आयकॉन खेळाडूंचा समावेश असणार आहे.

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ लाख ७५ हजार ५७५ रुपये, तर द्वितीय पारितोषिक २ लाख ७५ हजार ५७५ रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय ‘मॅन ऑफ द सिरीज’साठी आकर्षक मोटरसायकल, तसेच ‘मॅन ऑफ द मॅच’साठी विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग, उत्कृष्ट आसन व्यवस्था, डीजे साउंड व लेझर शो यांसारखी आकर्षणे असणार आहेत. तसेच सामने YouTube Live द्वारे प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश फी ४० हजार रुपये ठेवण्यात आली असून, इच्छुक संघांनी लवकरात लवकर नोंदणीसाठी आप्पा कल्याणकर (९९६००५११९६), दिनेश मुद्रस (९४२२४३६३१८) व राजू वायंगणकर (९४२२४३६९८४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा