You are currently viewing सावंतवाडीत सक्शन व्हॅनचे लोकार्पण; स्वच्छतेसाठी नगरपरिषदेला नवे बळ
Oplus_16908288

सावंतवाडीत सक्शन व्हॅनचे लोकार्पण; स्वच्छतेसाठी नगरपरिषदेला नवे बळ

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले व ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

 

सावंतवाडी / (प्रतिनिधी):

सावंतवाडी नगरपरिषदेस स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत अडीच हजार लिटर क्षमतेची सक्शन व्हॅन प्राप्त झाली असून, त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले व प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

शहराच्या स्वच्छतेसाठी हे वाहन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ फोडून लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आदिवेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, देवा टेमकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, निलम नाईक, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, प्रशासकीय अधिकारी प्राची पाटील, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडित आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा