You are currently viewing फोंडाघाटमध्ये दिंडी सोहळा उत्साहात; पारंपरिक वारसा जपला

फोंडाघाटमध्ये दिंडी सोहळा उत्साहात; पारंपरिक वारसा जपला

फोंडाघाटमध्ये दिंडी सोहळा उत्साहात; पारंपरिक वारसा जपला

स्व. सचिन नारकर यांच्या प्रेरणेने दिंडीचे आयोजन

फोंडाघाट

फोंडाघाट येथे आज दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्वर्गीय सचिन नारकर यांनी रुजवलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे चालू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विद्यार्थ्यांची व विविध दिंडींची आकर्षक उपस्थिती

फोंडाघाट हायस्कूलची दिंडी तसेच वेंगुर्ला येथून आलेल्या दिंडीने विशेष आकर्षण ठरले. विविध ठिकाणांहून आलेल्या दिंडींमुळे परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

ढोल पथकाने रंगवला सोहळा

संध्याकाळी सुमारे ७ वाजता सुरू झालेल्या दिंडीमध्ये ढोल पथकाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जयसिंग कोथांबीरे यांनी साकारलेले ‘बाळू मामां’चे रूप विशेष लक्षवेधी ठरले.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी अजित नाडकर्णी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागींचे अभिनंदन केले. परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान आणि अभिमान व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा